vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी

 

 सांगली, दि. प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस तसेच कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळीत होणारी वाढ, कोयना व वारणा धरणांचा विसर्ग इत्यादी सर्व बाबी लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामधील तसेच मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना दि. 20 व 21 ऑगस्ट या दोन दिवस सुट्टीचे आदेश निर्गमित केले आहेत.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना स्थलांतर झाल्यानंतर राहण्यासाठी शाळांची जागा, शाळा खोल्या उपलब्ध करून देण्याकामी जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 2 ऑगस्ट 2019 अन्वये हे आदेश निर्गमित केले आहेत.

 तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावयाचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन

निष्पक्षपातीपणे काम करून निवडणुका सुरळीत पार पाडा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

अतिदुर्गम आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये जाऊन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा रुग्णांशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर ‘सराव कोकण – 2025’ ला प्रारंभ

पुढील वर्षी 15 लाख बेघरांना घरांच्या चाव्या सुपुर्त करणार येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • जून अखेर शेतकऱ्यांना कर्ज माफी ; नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान• आजपासूनच 12.35 पैसे दराने कांदा खरेदी सुरु प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या पाच लाख घरांचे उत्साहात लोकार्पण…