vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव…

मुंबई, प्रतिनिधी : क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर नवे क्रीडा धोरण तयार करण्यात यावे. तसेच राज्यातील खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे बदल करावे. क्रीडा महोत्सवात जिल्हा तसे तालुकास्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करावे. शाळा महाविद्यालय विद्यापीठांना तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन, फिट इंडिया शपथ आणि ६० मिनिटे संघ खेळ व विरंगुळ्याचे खेळ आयोजित करावे.

३० ऑगस्ट रोजी स्थानिक/आदिवासी खेळ, इनडोअर स्पोर्ट्स, शाळा/महाविद्यालय स्तरावरील क्रीडा, वादविवाद, फिटनेस व्याख्याने, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. ३१ ऑगस्ट रोजी संडेज ऑन सायकल Sundays on Cycle या उपक्रमात देशभरातील नागरिकांचा सहभाग करून उपक्रम राबवावा.

या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात दोर खेचणे (Tug of war), ५० मी. शर्यत, रिले रेस, मॅरेथॉन, चमच्यातील गोळी शर्यत, गोणपाट शर्यत, योग, क्रिकेट, सायकलिंग, पिट्ठू सारखे स्थानिक खेळ, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, दोरीवर उड्या मारणे, बुद्धिबळ, ऑलिंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० मी. स्पीड वॉक, १ किमी वॉक, योग, श्वसनाचे व्यायाम, सांध्यांचे व्यायाम, स्ट्रेचिंग चॅलेंज, सायकलिंग या क्रीडा प्रकाराचा सहभाग करावा.

 

०००

 

 

संबंधित पोस्ट

उद्योग पुरस्कार वितरण सोहळा-औद्योगिक विकासाला चालना;सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला होणारØ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार*मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! – सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!

vishwatmaklokswamivarta

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार

मुंबईतील लालबागचा मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta