vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

27 लाखाच्या सोन्याचे दागिन्याचे चोरी करणाऱ्याला अटक..

27 लाखाच्या सोन्याचे दागिन्याचे चोरी करणाऱ्याला अटक..

मुंबई प्रतिनिधी-27 लाखाच्या सोन्याचे दागिन्याचे चोरी करणाऱ्याला एका आरोपीला माटुंगा पोलिसांनी कसून शोध घेऊन सापळा रचून अटक केली

प्राप्त माहितीनुसार-दिनांक 17/12/2023 रोजी रात्री 00.15 वा. फिर्यादी श्री. बलराम कुमार सिंग व इतर सहकारी हे दादर स्टेशनहून टॅक्सीने लोअर परळकडे जात असताना, घटनास्थळ रामी हॉटेल समोरच्या रस्त्यावर अनोळखी इसमांनी टॅक्सी अडवून त्यांना मारहाण केली व त्यांच्या जवळील लाल रंगाची बॅग (मुद्देमाल – 35 किलो कास्टिंग गोल्ड व गोल्ड फायलिंग डस्ट, किंमत सुमारे ₹27 लाख) जबरदस्तीने हिसकावून पळून गेले. यावरुन गु.र.क्र. 538/2023 भा.दं.वि. कलम 395, 341, 347, 323, 504, 120(बी) अन्वये माटुंगा पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल करण्यात आला व तपासावर घेण्यात आला.

#माटुंगा_पोलीस स्टेशन कडुन घटनास्थळाचे 200 हुन अधिक कॅमे-यांचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करुन आणि अन्य महत्वाचा तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील अवघ्या तीन दिवसात आरोपींचा शोध घेतला होता. पुढे गुन्ह्यातील सात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पंचनामा करून रोख रक्कम ₹2 लाख, सोन्याची 126.2 ग्राम वजनी लगड, 6 किलो 100 ग्रॅम कास्टिंग गोल्ड व फायलिंग डस्ट, तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपीतांची ओळख पटवण्यात आलेली आहे.

गुन्ह्यातील पाहिजे मुख्य आरोपी निलेश अखिलेश श्रीवास्तव, वय – 32 वर्षे, पत्ता : रुम नं. 07, सिद्धीविनायक चाळ, स्मशानभूमी, टिटवाळा (प), ठाणे हा आरोपी मागील दीड वर्षापासून फरार होता. फरारी काळात त्याने आपला मोबाईल फोन बंद ठेवला, दाढी वाढवली, गेटअप बदलला आणि उत्तर भारतातील विविध ठिकाणी वास्तव्य करत होता आणि चकमा देत होता. तरी त्यास तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पाळत ठेवण्यात येत होती. अखेर माटुंगा पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपी निलेश श्रीवास्तव याला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री.देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने (मध्य प्रादेषिक विभाग ), पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर,(परिमंडळ 4, मुंबई) स.पो.आ. माटुंगा विभाग श्री सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. केशव वाघ, पो.उपनि. संतोष माळी, पो.शि./091675 देवेंद्र बहादुरे, पो.शि./091872 प्रवीण तोडासे, पो.शि./090973 किशोर देशमाने यांनी ही कारवाई केली.

संबंधित पोस्ट

पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 ने 3 अवैध बंदुक आणि जिवंत दारूगोळा बाळगलेल्या दोन अटक

vishwatmaklokswamivarta

सोनसाखळी जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; दोन्ही गुन्ह्यांतील ८६,७९४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त। माटुंगा पोलीस ठाण्याची कारवाई

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ₹122 कोटींची बँक फसवणूक – बँकेच्या महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल!

vishwatmaklokswamivarta