vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाई होणार

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाई होणार

 

नवी दिल्ली प्रतिनिधी: सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत त्यांचे निर्जंतुकीकरण (नसबंदी) आणि लसीकरण करणे अनिवार्य केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की अशा कुत्र्यांना उपचार आणि नसबंदीनंतर त्यांच्या क्षेत्रात परत सोडले जाईल. मात्र, रेबीजग्रस्त कुत्र्यांना सोडण्यात येणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा आदेश केवळ दिल्ली-एनसीआरपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी लागू असेल. यामुळे आता सर्व राज्य सरकारांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना या संदर्भात पावले उचलावी लागणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यास मज्जाव न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालण्यास बंदी घातली आहे. आता त्यांना फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच खाऊ घालता येईल. या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

11 ऑगस्ट रोजी दिलेल्या जुन्या आदेशात सुधारणा करत दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा नवीन अंतरिम आदेश दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात सर्व राज्यांना पक्षकार केले असून आता प्रत्येक राज्याने आपल्या हद्दीत या आदेशाची अंमलबजावणी करावी लागेल.

सुरक्षिततेवर भर,न्यायालयाने म्हटले की, हा निर्णय फक्त जनावरांच्या कल्याणासाठीच नाही तर सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण रेबीजसारख्या धोकादायक आजारांचा प्रसार थांबवणे आणि लोकांना सुरक्षित वातावरण देणे ही सरकारची जबाबदारी आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.

2024 मध्ये 31 लाखांहून अधिक कुत्र्यांनी घेतला चावा,या सुनावणीच्या वेळी 2024 मध्ये देशभरात एकूण 31 लाखांहून अधिक भटक्या कुत्र्‍यांनी चावा घेतल्याच्या नोंदी आहेत. यामध्ये प्रत्येक दिवशी 10000 हून अधिक प्रकरणं समोर आलेली आहेत. यामध्ये या कुत्र्याच्या चाव्यामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू देखील झाला असल्याचे WHO च्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे न्यायालयाने लोकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

बुलढाणा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वअभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’

vishwatmaklokswamivarta

खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान 620 चौ.फूटाची सदनिका;निविदा प्रक्रियेला गती द्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन