vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

जालना प्रतिनिधी: देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी दरवर्षी २९ ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने माय भारत जालना व ड्रिबल स्पोर्ट अकॅडमी यांच्या वतीने जालना शहरात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

जुना जालना येथील पाठक मंगल कार्यालय (क्रिकेट टर्फ) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेपूर्वी कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व पटवून सांगितले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रमाता अकॅडमीचे अनिलकुमार धारे उपस्थित होते. तसेच रेल्वे पश्चिम विभागाचे फुटबॉल प्रशिक्षक सदानंद निर्मल, ड्रिबल स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष जयपाल राठोड, पंकज बागल, जालना जिल्हा फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष इस्माईल शेख, फुटबॉल क्षेत्रातील प्रशिक्षक रियाज शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिलकुमार धारे यांनी खेळाड्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “क्रीडा ही केवळ शारीरिक तंदुरुस्ती साठीच नसून मानसिक विकासासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. स्पर्धा जिंकणे-हरणे गौण असून खेळामध्ये सहभाग घेणे हेच खरे यश आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कार आत्मसात करण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी देखील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

स्पर्धेत दोन संघांनी सहभाग घेतला. सामन्यात आर अकॅडमीने विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक हुद्दा उर्दू शाळेने पटकावला. विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार ड्रिबल स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष जयपाल राठोड यांनी केले. त्यांनी माय भारत जालना तसेच सर्व मान्यवर, खेळाडू व प्रेक्षकांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.या फुटबॉल स्पर्धेमुळे जालना शहरात राष्ट्रीय क्रीडा दिनाला एक नवा उत्साह लाभला. युवकांमध्ये फुटबॉलबद्दलची आवड वाढविण्यासाठी अशा स्पर्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर घ्याव्यात, अशी मागणी क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर

पद्म पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी ‘समाधान समारोह’ विशेष लोक अदालत वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांना सहभागाचे आवाहन

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर“कृषी समृद्धी योजना” राबविणार- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे· दरवर्षी सुमारे ५००० कोटी तर आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक