vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल..

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल..

 अमरावती, प्रतिनिधी: अमरावती शहरात शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे. ट्रान्सपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौक: या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांसाठी वाहतूक एका बाजूने (वन-वे) सुरू राहील.

चित्रा चौक ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दिपक चौकमार्गे वळविण्यात येतील.हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात सर्व जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतूक महाजनपुरा मार्गे वळवण्यात येईल.

जवाहर गेट ते टांगा पडाव: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंदी राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतूक सराफा-गांधी चौक-जयस्तंभ मार्गे वळवण्यात येईल.लालखडी ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंद असून इतर हलक्या वाहनांची वाहतूक लालखडी रिंग रोड मार्गे वळवण्यात येतील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम १९८८ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतजालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मिळालेल्या वाहनांचे लोकार्पणपोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर  – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर· सभापती, सदस्य पदांची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला ; राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये अडीच लाख मतदार, 291 मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदतपदवीधरांनी व शिक्षकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

धरण उशाला आणि घसा मात्र कोरडा.!*