vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा

  अमरावती, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर नियुक्ती देण्यासाठी आज रोजगार मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले.     यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अनुकंपा नियुक्ती ही शासनाची सहानुभूतीपूर्ण प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना याचा निश्चितच लाभ मिळेल. अनुकंपा हा प्राधान्याचा असून हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळावे, अशा सूचना केल्या.     अनुकंपाधारकांच्या अडचणी जाणून शासन निर्णय काढला आहे. संपूर्ण राज्यामध्ये १५ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अनुकंपाधारक व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक असलेल्या पदाचे ऑप्शन विचारपूर्वक द्यावे. रिक्त पदानुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांना १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

      मेळाव्यामध्ये गट-क सामाईक प्रतीक्षा यादीतील एकूण १५० उमेदवारांपैकी ११६ उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांकडून शासकीय सेवेत नियुक्तीसाठी पसंतीक्रम भरून घेण्यात आला.   विविध विभागांतील रिक्त असलेल्या एकूण ४५ पदांवर नियुक्ती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला.

अंतिम शिफारसपत्र प्राप्त उमेदवारांना संबंधित विभागांमार्फत एकत्रितपणे नियुक्तीपत्र देण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजन भवन येथे मेळावा घेण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांतील अधिकारी, उमेदवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

लातूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून दहा जणांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार

कृपया प्रसिद्धिसाठी -युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य,करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !* सनातन संस्थेच्या आश्रमात श्री ललिता त्रिशती पूजन !

vishwatmaklokswamivarta

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते नूतनीकृत ‘अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया’चे लोकार्पण