vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेगाव येथील टावरी परिवाराकडून मरणोत्तर नेत्रदान…

शेगाव येथील टावरी परिवाराकडून मरणोत्तर नेत्रदान…

बुलढाणा, प्रतिनिधी : शेगाव येथील टावरी परिवाराने समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे कार्य घडवून आणत मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श घालून दिला आहे. येथील ज्येष्ठ नागरिक दिवंगत रामगोपाल टावरी (वय 80 वर्षे) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.

ही प्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यासाठी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रवी शिंदे, डॉ. अमोल उगले, नेत्रसमुपदेशक योगेश सिरसाट व सौरभ हिवाळे यांनी समन्वय साधत संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या कार्यामुळे समाजात टावरी कुटुंबाचे कौतुक होत असून विविध स्तरांतून त्यांचा गौरव केला जात आहे. दिवंगत रामगोपाल टावरी यांच्या इच्छापूर्तीमुळे अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्यास व कुटुंबाच्या निर्णयास दाद दिली आहे. नेत्रदानामुळे गरजू व्यक्तींना नवीन दृष्टी लाभणार असून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

नेत्रदानाच्या या उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळण्याची संधी उपलब्ध होणार असून, टावरी परिवाराने केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

संत गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमनभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते भव्य स्वागत…

धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अभिवादन केलं.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न,- सन 2025-26 साठी 632 कोटी, 29 लाखांचा निधी मंजूर- वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश- प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार

इग्नाईट कन्व्हेन्शनमधून मुंबई उपनगराच्या उद्योजकता विकासाला नवी दिशा

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा विभागस्तरीय ७० व्या कामगार नाट्य स्पर्धा-प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण उद्या(दि.१५)

vishwatmaklokswamivarta

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल