vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

नविदिल्ली l प्रतिनिधी – केंद्र सरकार कडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंग ची गरज नाही. पेगॅसिस बाबत चा केंद्र सरकार वरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशी ही जो संसद सदस्य आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल अशा गोंधळी खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे मात्र विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे.सलग तीन दिवसा पर्यंत गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे.यामुळे संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो.त्यातून देशाचे नुकसान होते.त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार चौथ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्यास 2 वर्षांसाठी निलंबित करावे. सरकार पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये एन डी आर एफ चा बेस कॅम्प उभरण्याची मागणी पुढे आली आहे.या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपण प्रयत्न करू असे ना रामदास आठवले म्हणाले.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खेळा नाही तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे असे ना रामदास आठवले म्हणाले. आगामी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए चे सरकार निवडून येईल असा दावा ना रामदास आठवले यांनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही.त्यामुळे मोदीं समोर कोणतेही मोठे आव्हान नाही असे ना रामदास आठवले  म्हणाले

संबंधित पोस्ट

मुंबईत विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू.धारावी पूरमुक्तीचा खर्च १९० कोटींवर…!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून बेकायदेशीर खरेदी प्रकरण रद्द करण्याची शासनाकडे मागणी !सोमेश्वर देवस्थानानंतर श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे षड्यंत्र!* महाराष्ट्रातील अनेक हिंदू मंदिरांच्या जमीनी संकटात !

vishwatmaklokswamivarta

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप….

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे एकत्रित कार्ड काढण्यासाठी आरोग्य विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून उत्तम पद्धतीनं काम करत आहे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा.

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा