vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरराजकारणस्थानिक बातम्या

महापालिका जिंकल्यावर सरकारच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका” — उद्धव ठाकरे.

महापालिका जिंकल्यावर सरकारच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका” — उद्धव ठाकरे. उबाटा प्रमुख

राज्य प्रतिनिधी- मराठवाड्यातील परिस्थिती खूपच वाईट आहे. येथून मी शिवसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करावी.” – आणि,शिवसेना तोडण्याचे प्रयत्न नेहमीच झाले. पण जे पळून गेले आहेत ते पितळ आहेत आणि जे अजूनही माझ्यासोबत आहेत ते सोने आहेत.” – उद्धव ठाकरे, शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख

आज विजयादशमीनिमित्ताने शिवाजी पार्कवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात भर पावसात त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.सोबतच त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही काही प्रश्न विचारले आहेत.ओला दुष्काळ जाहीर करण्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूराच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर न करण्यावरून सरकारवर टीका केली.म्हणाले की, “शेतकरी विचारतोय आम्ही खायचं काय… अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नव्हती. सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. फुल नाही फुलाची पाकळी देऊ. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करू. आजचे जे मुख्यमंत्री आहेत. ते आमचं सरकार होतं तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगत होते आणि आता म्हणत आहेत की ही संज्ञाच नाहीये. मी आजही सांगतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झालंय, त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केलीच पाहिजे. मी माझ्या सरकारमध्ये कर्जमुक्ती केली होती. निवडणुकीच्या तोंडावर नाही.”

‘सोनम वांगचुक देशद्रोही कसे?’उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांना झालेल्या अटकेवरूनही सरकारवर टीका केली.ते म्हणाले की, “सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त या माणसाने अतिशय दूर्गम भागात त्यांनी न्यायहक्कासाठी आंदोलन सुरू केलं. न्यायहक्क ही लोकशाहीतील मुलभूत गरज आहे. या लढाईसाठी उपोषण सुरु ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. जेनझी लेह-लडाखमध्ये रस्त्यावर आले. तेव्हा त्यांना मोदी सरकारने रासुका कायद्याखाली आतमध्ये टाकलं. कारण मोदींची स्तुती करत होते, तोपर्यंत वांगचुक देशद्रोही नव्हते. आता त्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. नवाज शरीफचा केक गुपचूप खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणावं?”पुढे ते म्हणाले की, “तीन वर्ष मणिपूर जळतंय. मणिपूरला गेल्यावर मोदींनी भाषण केलं की, मणिपूरच्या नावातच मणी आहे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणी दिसला पण जनतेच्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही?”

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

इंडिया टुडेच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा क्रमांक दहावा आहे, हा मुद्दा मांडत त्यांनी फडणवीसांवर टीका केली.ते म्हणाले की, “इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये सगळ्यात प्रसिद्ध योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू, नितीश कुमार, स्टॅलिन, पिनारायी विजयन, रेवंथा रेड्डी, मोहन यादव, हेमंता बिस्वा सरमा आणि दहाव्या क्रमांकावर फडणवीस आहेत. हे पहिले येणार कसे, सगळी बजबजपुरी करुन ठेवली आहे.”पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, “सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईनं स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला आहे. शेतकऱ्यांच्या घरादाराचा चिखल झाला आहे. शेती वाहून गेली आहे. राहायचं कुठे? शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नव्हती. आजपर्यंत मराठवाडा दुष्काळग्रस्त झाला होता. आता तिथे अतिवृष्टी झाली आहे.”

संबंधित पोस्ट

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान

vishwatmaklokswamivarta

मोताळा तालुक्यातील अवसायनातील 34 संस्थांची नोंदणी रद्द होणार;आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार;13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..