vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवाळीपूर्वी वेतन अदा करा : आमदार सुधाकर अडबाले मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच प्रधान सचिवांकडे मागणी…

दिवाळीपूर्वी वेतन अदा करा : आमदार सुधाकर अडबाले मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच प्रधान सचिवांकडे मागणी…

गडचिरोली : प्रतिनिधी दि. १८ ऑक्टोंबर २०२५ पासून दिवाळीचा सण सुरु होत आहे. देशासह राज्‍यात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. त्‍यामुळे राज्‍यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास बहु. कल्‍याण व कौशल्य व उद्योजकता विभागाअंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त सर्व शिक्षक, प्राध्यापक, सर्व निदेशक व कर्मचारी यांचे ऑक्‍टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच पाचही विभागाच्या प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्‍यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, आयटीआय येथे कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळी हा सण आनंदाने साजरा करता यावा, याकरिता दिनांक १८ ऑक्‍टाेंबर २०२५ पूर्वी वेतन होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे नेहमी शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झटणारे आमदार सुधाकर अडबाले यांनी सदर कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी व्‍हावे, याकरिता मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

राज्‍यातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबरचे वेतन दिनांक १८ ऑक्‍टाेंबर २०२५ पूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत वेतन तरतूद तात्‍काळ उपलब्‍ध करून द्यावी व दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्याबाबत संबंधितांना आदेश निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मा. मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास बहु. कल्‍याण व कौशल्य व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

संबंधित पोस्ट

महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन**पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना शेती, पिके, पशुधन, घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश…!!