vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक..

नवी दिल्ली प्रतिनिधी-दहशतवाद-मुक्त जम्मू आणि काश्मीरचे उद्दिष्ट साध्य करण्याप्रती मोदी सरकारच्या अढळ कटिबद्धतेचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला पुनर्रुचार, देशाच्या शत्रूंनी जम्मू आणि काश्मीरमध्ये जोपासलेले दहशतवादी जाळे, सुरक्षा दलांच्या निश्चयी प्रयत्नांमुळे जवळजवळ उध्वस्त झाले आहे
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की या भागातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न चिरडून टाकण्यासाठी आपल्या सुरक्षा दलांना दिलेले संपूर्ण स्वातंत्र्य यापुढेही दिले जाईल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी उचललेल्या पावलांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील एकंदर सुरक्षाविषयक परिदृश्य मजबूत करण्यात मदत झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली प्रशंसा,या भागातील दहशतवादाचे संपूर्ण उच्चाटनकरण्यासाठी एकत्र येऊन काम करण्यात आणि अत्यंत सजगता राखण्यात सर्व सुरक्षा यंत्रणांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली अधोरेखित
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की हिवाळ्याची सुरुवात होत असताना, सीमेपलीकडून घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी बर्फवृष्टीचा वापर करु शकणार नाहीत याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्णपणे तयारीत राहावे लागेल,

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक झाली. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्कर प्रमुख, मुख्य सचिव तसेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे (सीएपीएफ्स) महासंचालक यांच्यासह केंद्र सरकार, लष्कर तसेच जम्मू आणि काश्मीर प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना दहशतवाद-मुक्त जम्मू आणि काश्मीरचे उद्दिष्ट साध्य करण्याप्रती मोदी सरकारच्या अढळ कटिबद्धतेला केंद्रीय गृहमंतत्री अमित शाह यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, देशाच्या शत्रूंनी जम्मू आणि काश्मीरमध्ये जोपासलेले दहशतवादी जाळे, सुरक्षा दलांच्या निश्चयी प्रयत्नांमुळे जवळजवळ उध्वस्त झाले आहे. हे प्रयत्न सातत्याने, असेच सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने पुरवली जातील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या भागातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न चिरडून टाकण्यासाठी आपल्या सुरक्षा दलांना दिलेले संपूर्ण स्वातंत्र्य यापुढेही दिले जाईल, असे देखील केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी उचललेल्या पावलांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रशंसा केली. या उपाययोजनांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील एकंदर सुरक्षाविषयक परिदृश्य मजबूत करण्यात मदत झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समन्वयीत आणि अत्यंत सजग पद्धतीने काम करण्यात सर्व सुरक्षा यंत्रणांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी अधिक भर दिला. ते पुढे म्हणाले की, हिवाळ्याची सुरुवात होत असताना, सीमेपलीकडून घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी बर्फवृष्टीचा वापर करु शकण नाहीत याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्णपणे तयारीत राहावे लागेल.

संबंधित पोस्ट

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलीआरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी…

बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांची गय नको ; महसूल व पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश-जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचा निपटारा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे मोफत आरोग्य सेवा सुरू सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दोन लाख नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा…

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta