vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर- आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर- आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

 सांगली, प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन-२०२६ साठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा. खाजगी कंपनी या मधील आस्थापना, सर्व दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स, इत्यादी) या मधील कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना संपूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

 उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/ व्यवस्थापनाने वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

आस्थापनेने निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2950119, अथवा ई-मेल आयडी aclsangli@gmail.com या ठिकाणी मतदारांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहनही सहाय्यक कामगार आयुक्त मु.अ. मुजावर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

सरकारची मराठा-ओबीसी ऐक्याला धक्का देणारी भूमिका — डॉ. संजय लाखे पाटील; उपसमितीला पडताळणीचा अधिकार नाही

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत मृत प्रवाशांना श्रद्धांजली

सातारा, खटाव, फलटण येथील मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु*

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात 

पाच वर्षांच्या  चिमुकलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर…