vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळेरोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान..

नागपूर, प्रतिनिधी: जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर महिन्याला हा उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तथा युवा फाउंडेशन व नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल (नरेडको) विदर्भच्या वतीने महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे आयोजित ‘पालकमंत्री रोजगार मेळावा 2.0’ मध्ये मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रोजगार मेळावा आयोजन समितीने यापूर्वीच्या पहिल्या रोजगार मेळाव्यात 136 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली होती. उपक्रमातील आजचा हा दुसरा मेळावा असून यातही युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला रोजगार मेळावा आयोजित करून जास्तीत-जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा व पुढील रोजगार मेळाव्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. मेळाव्यात सहभागी कंपन्याच्या प्रतिनिधींचे आभार मानत यापुढेही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री रोजगार मेळाव्यासाठी 1 हजार युवक-युवतींनी नोंदणी केली. यातील 500 जणांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन विविध क्षेत्रातील 16 कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या. 100 पेक्षा जास्त उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा-परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार -राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर

vishwatmaklokswamivarta

न्याय देवते”चा पुतळा राज्य घटनेच्या मुल्यांचे प्रतीक – न्यायमुर्ती के. व्ही. स्वामीनाथन उच्च न्यायालयात “न्याय देवते”च्या पुतळ्याचे अनावरण

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक  

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत टास्क फोर्सने अभ्यास दौरा करून अहवाल द्यावा- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta