vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी..

राज्य प्रतिनिधी -गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र, 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे

०००

संबंधित पोस्ट

जीएसटी’ मध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ वा वस्तू व सेवा कर दिवस समारंभ

सर्व विभागांनी ग्रामिण भागात समन्वयाने आरोग्यसेवा द्याव्या- जिल्हाधिकारी स्वामी

आताची मोठी बातमी- | मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सूचना 🚆🌧️मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत ड्रोन व सीसीटीव्ही दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न