vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड.

(सोलापूर) प्रतिनिधी  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे  यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी सेनेचा शाखा अध्यक्ष ते पक्षाचा नेता असा धोत्रे यांचा प्रवास आहे.

राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता. श्री. धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या वेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत श्री. धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यांना पक्षात नेतेपद देण्यात आले आहे. सोमवारी मुंबईत कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दिलीप धोत्रे यांना राज ठाकरे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन सन्मान केला. या वेळी पक्षाचे मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, सरचिटणीस संतोष नागरगोजे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात मागील दीड वर्षापासून श्री. धोत्रे यांनी अनेक गोरगरीब व मजुरांना अन्नाधान्य, कपडे मोफत देऊन मोठी मदत केली आहे. अडचणीच्या काळात अनेकांना आर्थिक मदत दिली. कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल देखील सुरू केले. त्याद्वारे रुग्णांवर माफक दरात उपचार केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यांना पक्षात मोठे स्थान दिले आहे. त्यांच्या निवडीनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

 

संबंधित पोस्ट

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी“इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर” दक्ष

vishwatmaklokswamivarta

माघी गणेशोत्सवातील 838 श्रीगणेशमूर्तींच्या कृत्रिम तलावांमधील विसर्जनाव्दारे नागरिकांनी जपला पर्यावरणशील दृष्टीकोन….

vishwatmaklokswamivarta

शिवडी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने एका गर्भवती महिलेचा जीव वाचवला आणि तिला सुरक्षित प्रसूतीसाठी मदत केली. या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस सह-आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी यांनी निर्भया पथकाचे अभिनंदन केले.

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांसाठी कार्यशाळा तज्ज्ञांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि शुद्धलेखनाचे मंत्र..

मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी अभिनेत्री सारा अली खानने केला लोकल व रिक्षाने प्रवास

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक २०२४ – पहिली यादी 100 उमेदवारांची घोषणा-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे

vishwatmaklokswamivarta