vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर संपन्नविविध बँकांच्या 148 खातेदारांचे 3.52 कोटी रुपयांचे खाते पुर्नजीवित

ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर संपन्नविविध बँकांच्या 148 खातेदारांचे 3.52 कोटी रुपयांचे खाते पुर्नजीवित

     अमरावती, प्रतिनिधी: ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत मिळाली नसलेल्या आर्थिक मालमत्तांच्या निकालीकरणासाठी आज जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता फंड या शिबिराचे आयोजन जिल्हाची अग्रणी बँक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने अभिनंदन को ऑपरेटिव बँकेच्या सभागृहामध्ये करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध बँकांच्या 148 खातेदारांचे 3.52 कोटी रुपयांचे खाते पुर्नजीवित (ॲक्टिवेट) केले गेले.

अभिनंदन बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा, रिजर्व बँकेचे सहायक महाप्रबंधक विनोद कुमार के., अभिनंदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी देठे, अभिनंदन बँकेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुदर्शन गांग, सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक सुनील पांडेय, स्टेट बँकेचे नवीन उप्प्‍लवार, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यावेळी उपस्थित होते.

     या उपक्रमामुळे खातेदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्याची संधी मिळत आहे. 10 वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केलेला नाही, अशा ठेवी ‘ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी’मध्ये हस्तांतरित करण्यात येतात. खातेदारांना त्या परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या शिबिराच्या आयोजन करण्यात आले.

     शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवींचे निराकरण करणे तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासंबंधी मार्गदर्शन शिबिरात करण्यात आले. वित्तीय सेवा विभाग आणि राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या निर्देशानुसार हे शिबिर घेण्यात आले.

    ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत नामनिर्देशित, लाभार्थी या शिबिरास उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविक सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया क्षेत्रीय प्रबंधक सुनील पांडेय यांनी केले. संचालन नरेश हेडाऊ जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक यांनी तर लीड बँकेचे रोहन पोंक्षे यांनी केले.

 00000

संबंधित पोस्ट

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू, ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास-राज्यमंत्री माधुरी मिसाळoj

मुंबईतील गोवंडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे याव-सभापती प्रा.राम शिंदे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आपले भविष्य घडवावे-पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती;रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा– मंत्री नितेश राणे