vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

राज्य प्रतिनिधी-: देशभरात सध्या हवामानात सातत्यानं बदल होत असून, (Cyclone Montha) मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं याचा परिणाम फक्त आंध्र आणि ओडिशामध्येच नव्हे तर, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागासह विदर्भापर्यंत दिसून येणार आहेत. केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात एकिकडे किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा असतानाच पर्वतीय राज्यांमध्ये हळुहळू थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये पाऊसधारा?

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि थेट गोव्यासह मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. पूर्व विदर्भात तुलनेनं पावसाचा जोर अधिक राहणार असून इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असेल. तर, उर्वरित राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण पट्टा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर इथं मध्यम स्वरुपातील पाऊस आणि पहाटेच्या वेळीचा गारठा असं संमिश्र हवामान पाहायला मिळेल.

मुंबईत दिवसा पावसाच्या सरींची शक्यता…  पावसाचा मुक्काम कायम असून, मुंबईत नेमका कोणता ऋतू सुरुय याचाच थांगपत्ता लागेनासा झाला आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकत असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून परिणामी शहरात बुधवार आणि गुरुवारी मुंबईत दिवसासुद्धा कधीही कुठंही या पाऊसधारांची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये पाऊसधारा? दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि थेट गोव्यासह मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. पूर्व विदर्भात तुलनेनं पावसाचा जोर अधिक राहणार असून इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असेल. तर, उर्वरित राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण पट्टा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर इथं मध्यम स्वरुपातील पाऊस आणि पहाटेच्या वेळीचा गारठा असं संमिश्र हवामान पाहायला मिळेल.

  अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकत असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून परिणामी शहरात बुधवार आणि गुरुवारी मुंबईत दिवसासुद्धा कधीही कुठंही या पाऊसधारांची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक..

अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय-विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित मार्ग..

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

📌आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात दर्जात्मक सुधारणांसाठी ठोस पावले उचला*  *रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना**वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूरक कामांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवा💊*औषधे खरेदी व वितरण तपासण्याच्या सूचना

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न