vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली…

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली…

मुंबई, प्रतिनिधी : मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वस्त्रहरण या विक्रमी नाटकासह, इतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठीचे स्वर्गीय गवाणकर यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

अभिजात मराठीचे सौंदर्य आणि सौष्ठव मालवणी बोली आणखी ठसठशीतपणे मांडते. अशा या मालवणीची नादमाधुर्यता आणि तिचा ठसका स्वर्गीय गवाणकर यांनी आपल्या नाट्यकृतींतून जगभर पोहोचविला. त्यांच्या इतर नाट्यकृती देखील वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन राहिल्या आहेत. पौराणिक ढाच्यातील ‘वस्त्रहरण’ वर्तमानातील चपखल संदर्भ घेत आजही महाविक्रमी वाटचाल करीत आहे, ही त्यांच्या लेखनाची ताकद राहीली. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी, कला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. गवाणकर कुटुंबीय, मराठी रंगभूमी चळवळ, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे

000

संबंधित पोस्ट

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

ठाणे जिल्ह्यात मोबाईल मेडिकल युनिटचे उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते सत्कार

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन

बांधकाम विषयक मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांकडून 1.40 कोटीहून अधिक दंडवसूली-नोटीशीची दखल न घेणाऱ्या विकासकांवर काम बंद करण्याबाबतची होणार कडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…