vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानस्थानिक बातम्या

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट…

मुंबई, प्रतिनिधी- दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’ उपलब्ध करून देणे, हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना योजनांची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या चॅटबॉटमध्ये भाषिणी तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

सचिव मुंढे म्हणाले, या चॅटबॉटच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती आता दिव्यांग व्यक्तींना जलद गतीने मिळू शकते. यामुळे तक्रार नोंदवून तिची सद्यस्थिती जाणून घेणे आता सोयीचे झाले आहे. ‘सेल्फ-ट्रॅकिंग’ सुविधेमुळे तक्रारीची सद्यस्थिती थेट व्हाट्सॲपवर तपासता येईल. ‘भाषिणी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, टाईप करणे शक्य नसलेल्या व्यक्ती आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजी भाषेत फक्त आवाज रेकॉर्ड करून पाठवू शकतात.

शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत हा चॅटबॉट तयार करण्यात आला असून हा चॅटबॉट इतर चॅटबॉटपेक्षा वेगळा आहे. यात प्रगत एआय मॉडेलचा वापर केला आहे, जे वापरकर्त्याची भाषा, संदर्भ आणि तक्रारीच्या विषयाची गंभीरता ओळखून तक्रारीचे आपोआप वर्गीकरण करते व संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते. संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासात तक्रारीची दखल घेणे बंधनकारक आहे.

पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांना तक्रार निवारणासाठी विशेष डॅशबोर्ड देण्यात आला आहे. तसेच विभाग साप्ताहिक स्तरावर सर्व तक्रारींचा आढावा घेणार असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’ भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजी* ग्रामीण भागातील गुणवंत आता होणार ‘आयएफएस’ अधिकारी* ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम..

रिपब्लिकन पक्षाचे साहित्यिकांशी विचारमंथन ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..