vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

रायगड-अलिबाग प्रतिनिधी:- भारतीय सैन्यादल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची ची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.15 डिसेबर ते दि.24 डिसेंबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 64 आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीनी केंद्रामध्ये पोहोचण्याची तारीख 14 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजता राहील. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

रायगड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्या दलातील अधिकारी पदाची संधी लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड अलिबाग येथे दि.13 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB – 64 कोर्ससाठी (किंवा संबधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानें प्रिंट दिलेल्या प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिषटांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे

 एस.एस.बी.वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंम्बाईड डिफेंस सव्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अँकेडमी बोड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकिट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले असावेत. व एनसीसी ग्रुप हेडक्कवार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस एस बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे यापैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी training.petenashik@gmail.com, pctcoic@yahoo.in व दुरध्वनी क्रं.0253-2451032 किंवा व्हॉटसअप क्रं. 9156073306 वर कार्यालयील वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगरात रविवारी भिक्खू करूणानंद थेरो यांचा ऐतिहासिक महाथेरो समारंभ व कठीण चिवरदान धम्मसोहळा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण,हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; वडेट्टीवार जाहीर माफी मागा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी