vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने (Mahadbt Portal) राबविण्यात येणार आहे,असे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे.

याअंतर्गत खालीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत.इ.८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदाने विजाभज विमाप्र, माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करणे, इयत्ती ५ वी ते ७ वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती लागू करणे, इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करणे, इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकत असणाऱ्या डीएनटी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती केंद्र पुरस्कृत योजना.

या सर्व योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत आणण्यात येत आहेत. महाडीबीटी पोर्टलवर https://permatric.mahait.org/login/login शाळेचे मुख्याध्यापक आपल्या यूजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगइन करून,शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करावे (मुख्याध्यापक व लिपिकांची माहिती समाविष्ट), विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.विद्यार्थी पात्र असलेल्या योजनेसाठी अर्ज नोंदणी करावी किंवा योजना लागू करावी, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दयानंद कोकरे यांनी आवाहन केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे – पांढरी काठी दिनानिमित्त दिला अंध व्यक्तिला आधार

vishwatmaklokswamivarta

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार*मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी  -जिल्हाधिकारी किशन जावळे