vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना;नोंदणीकृत गोशाळांकडून प्रस्ताव मागविले

महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना;नोंदणीकृत गोशाळांकडून प्रस्ताव मागविले

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजनेअंतर्गत देशी गोवंश संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या गोसेवा केंद्रांना सन्मानीत करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीकृत गोशाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नानासाहेब कदम यांनी कळविले आहे. त्यासाठी दि.१० डिसेंबर पर्यंत नामनिर्देश स्विकारण्यात येणार आहेत. दि.१० ते १४ डिसेंबर दरम्यान जिल्हास्तरीय नामनिर्देशनांची जिल्हा निवड समितीमार्फत छाननी केली जाईल. दि.१५ डिसेंबर रोजी प्रादेशिक निवड समितीकडे शिफारसीसह अर्ज पाठविण्यात येईल. दि.३० डिसेंबर पर्यंत प्रादेशिक निवड समिती परीक्षण करुन अंटिम निर्णय घेईल. दि.११ ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान प्रादेशिक निवड समितीकडून राज्य समितीस पात्र शिफारस प्रस्ताव सादर करेल, दि.१५ जानेवारी रोजी सन्मानित संस्थांची घोषणा होईल व दि.२६ जानेवारी रोजी सन्मान वितरण होईल,असे वेळापत्रक देण्यात आले आहे.

अटी व शर्तीः-पुर्वी सन्मानित गोशाळांना पुन्हा नामांकन करता येणार नाही. निवडीचे निकष पूर्ण करण्यासाठी संस्थेकडे किमान ५० गोवंश असणे अपेक्षित आहे. सुनिश्चित दिनांकानंतर प्राप्त प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. शिफारस, पाठपुरावा, आग्रही पुढाकार असल्यास प्रस्ताव वगळण्याची मुभा निवड समितीला असेल. शुद्ध देशी गोवंश पैदास, विकास व संवर्धन आणि गोमय मुल्यवर्धन हे महत्त्वाचे निकष राहतील. दोषी संस्थांचा विचार होणार नाही. विहित नमुन्यात प्राप्त प्रस्तावांचा विचार होईल. संस्थेने प्रस्तावासह आवश्यक सहपत्रे, पुरावे, फोटो, संदर्भ सादर करणे बंधनकारक असेल. सर्व गोशाळांनी आपले प्रस्ताव पीडीएफ स्वरुपात जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांच्या ई-मेलवर, ऑनलाईन सॉफ्ट कॉपी स्वरुपात जिल्हास्तरावरच सादर करावे,असे कळविण्यात आले

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न सभागृहात मांडला

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

vishwatmaklokswamivarta

जी.डी.सी. अण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षेचा अर्ज भरण्यास 17 मार्चपर्यंत मुदतवाढ..

प्रगती प्रकल्पामुळे पाच जिल्ह्यातील १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार – मंत्री प्रकाश आबिटकर महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ

vishwatmaklokswamivarta