vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महा-देवा फुटबॉल उपक्रम’अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

महा-देवा फुटबॉल उपक्रम’अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील फुटबॉलमधील प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी “महादेवा फुटबॉल उपक्रम” अंतर्गत निवड झालेल्या ६० मुला-मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा),वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यूआयएफए) आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, फिटनेस मॉड्यूल तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक खेळाडूला योग्य संधी, सक्षम मार्गदर्शन आणि दर्जेदार सुविधा देण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री कोकाटे यांनी सांगितले.

 

0000

संबंधित पोस्ट

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

एआय’ तंत्रज्ञानाशी करा मैत्री;जिल्हाधिकारीकार्यालयातील प्रशिक्षणात एआय चे धडे

ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपलाज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta