vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर जी. उत्तर विभागातील शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसरात संगम प्रतिष्ठान* या सामाजिक संस्थे चा एक अनोखा उपक्रम स्वच्छता अभियान…

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर जी. उत्तर विभागातील शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसरात संगम प्रतिष्ठान* या सामाजिक संस्थे चा एक अनोखा उपक्रम स्वच्छता अभियान…

मुंबई प्रतिनिधी-

भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर जी. उत्तर विभागातील शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसरात लाखोंच्या संख्येने उपस्थित अनुयायांच्या साक्षीने **संगम प्रतिष्ठान* या सामाजिक संस्थेने एक अनोखा उपक्रम राबविला.

**संस्थेच्या सचिव अँडव्होकेट कोमल घाग* यांनी पुढाकार घेऊन जी. उत्तर विभाग घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या परवानगीने संपूर्ण परिसरात आणि अन्नदान केंद्रावर संस्थेचे कचरावेचक नियुक्त करून रस्त्यावर पडणारा किंवा कचरा पेटीतून क्षेपणाभूमीवर जाणारा सुका कचरा, पेट बॉटल तसेच प्लास्टिक थैल्या जमा करण्यासाठी दिनांक 4/5/6 डिसेंबर रोजी सुमारे दरदिवशी 70 कचरावेचक नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून जवळपास तीन टन सातशे किलो सुका कचरा अडविला असून पर्यावरणाची होणारी हानी थांबविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

या कामी **संगम प्रतिष्ठान या संस्थेस कोकाकोला वेबरेजेस चे मोलाचे सहकार्य झाले. या सुका कचरा कलेक्शन सोबत संगम प्रतिष्ठान ने दोन दिवसात संपूर्ण परिसरात *चकाचक मुंबई** या पथनाट्यच्या माध्यमातून समस्त भीमसैनिकांच्या मनोरंजनासोबत जनजागृती केली.

या उपक्रमात पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवक आणि कचरावेचकाना संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पर्यावरण संवर्धन आणि जतन हा फक्त चर्चेचा किंवा तत्त्वज्ञानाचा विषय नसून फिल्डवर उतरून पर्यावरणीय जाणीवेतून दायित्व अमलात आणण्यासाठी केवळ प्रशासन नाही,तर समस्त मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा व महानगरपालिकेला सहकार्य करावे अशी अपेक्षा उपस्थितांनी केली.या उपक्रमाला साथ दिल्याबद्दल माननीय सहाय्यक आयुक्त जी. उत्तर यांचे संस्थेतर्फे *ॲडवोकेट कोमल तानाजी घाग** यांनीआभार मानले.

संबंधित पोस्ट

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण

दादर येथे आंदोलन काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी !पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक….