vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

नांदेड प्रतिनिधी : जिल्‍ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट, लोहा मतदानाच्या दिवशी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी निवडणूकीची सर्व प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे सर्व मतदान केंद्र परिसरात 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्‍यात येत आहे.

याबाबतचा आदेश भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्‍हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी निर्गमीत केला आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यातील नप/नपं- धर्माबाद, कुंडलवाडी, मुखेड, भोकर, किनवट, लोहा निवडणूक 2025 च्‍या अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यन्‍त अंमलात राहणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

देशभरात मकर संक्रांतीचं पर्व- देशासह महाराष्ट्रात कडाक्याची थंडीची शक्यता हवामान खात्याचा अंदाज…

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार देण्यास कटिबद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा ‘एक हात मदतीचा’ खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत-जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा-स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया उद्योगांना मोठे अनुदान10 टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, 250 मे. टन गोदाम व कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिटसाठी अर्जाची मागणी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta