vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

रायगड– प्रतिनिधी :जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम तसेच टीबी को–मॉर्बिडीटी समन्वय समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. अक्षयराज राठोड, डॉ. नालंदा पवनारकर, डॉ. प्रसाद वाईगणकर, डॉ. प्रदीप पोतदार, डॉ. विकास पवार, श्री. संजय माने, श्रीमती रेश्मा संकपाळ यांच्यासह विविध सामाजिक संस्था व कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी सिल्वर दर्जा प्राप्त केलेल्या ५६ ग्रामपंचायतींना यंदा गोल्ड दर्जा मिळावा तसेच जास्तीत जास्त ग्रामपंचायती टीबी मुक्त घोषित व्हाव्यात, या दृष्टीने प्रभावी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

सर्व टीबी रुग्णांची बँक खाती तयार करून प्रत्येक रुग्णाला निक्षय पोषण योजनाचा लाभ देण्यात यावा. एकही रुग्ण या योजनेपासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या चिप्स व कारटेजेसची कमतरता लक्षात घेता, त्यांची मुबलक उपलब्धता करून देण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच अधिकाधिक संस्थांनी निक्षय मित्र म्हणून पुढे येऊन रुग्णांना पोषक आहाराचे फूड बास्केट उपलब्ध करून द्यावेत, ज्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊन कुटुंब व समाजात टीबीचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

बैठकीची सविस्तर माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी दिली.

तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये श्रीमती जागृती गुंजाळ, श्रीमती प्रिया नारकर, श्री पंकज पाटील तर कॉर्पोरेट क्षेत्रातून श्री. लहु रोन्दल, श्रीमती नंदिनी मंदेराई, श्री. मंगेश पाटील, श्री. दत्तात्रेय शिंदे, श्री. दंतराव सतीश, श्री. विजय वाघमारे, श्री. किर्तीकांत पाटील, श्री. प्रमोद नाईक आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शिवसेनेचा झंझावात जिल्ह्यात निर्माण करा- शिवसेना नेते अंबादास दानवे- गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक मोहीम- जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामालालागावे- जिल्हाप्रमुख महेश नळगे- महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ• जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन

बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी..

vishwatmaklokswamivarta