vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारणस्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

मुंबई प्रतिनिधी-मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC Election) निवडणुकासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती. मात्र, पहिल्या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नबाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिला असून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, उद्यापासूनच या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही केले जाणार आहे. राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीपासून फारकत घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

मानव सेवा हीच ईश्वर सेवा – डॉ. जनक पल्टा मॅकगिलिंगन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना सर्वांच्या सहभागातून पुढे न्यावी – उपमुख्यमंत्री

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta