vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती 

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती

 

         नवी मुंबई प्रतिनिधी-   15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होत असून महानगरपालिका क्षेत्रातील 28 प्रभागांपैकी 1 ते 27 क्रमांकाचे प्रभाग यामध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे 4 सदस्य आहेत आणि 28 व्या प्रभागात ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे 3 सदस्य आहेत.

प्रत्येक मतदाराने प्रभागातील अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेकरिता एक मतदान करावयाचे आहे. म्हणजेच 27 प्रभागांमध्ये 4 व 28 व्या प्रभागात 3 सदस्यांना मतदान करावयाचे आहे.

     मतदारांना मतदान करतांना प्रभागातील अ, ब, क, ड अशा स्वतंत्र जागा कळण्यासाठी मतदान यंत्रावर प्रत्येक जागेकरिता वेगळया रंगाची मतपत्रिका असणार असून ‘अ’ जागेसाठी पांढ-या रंगाची, ‘ब’ जागेसाठी फिक्या गुलाबी रंगाची, ‘क’ जागेसाठी फिक्या पिवळ्या रंगाची आणि ‘ड’ जागेसाठी फिक्या निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे.

   मतदारांनी अ, ब, क, ड जागेमध्ये नमूद एका उमेदवारास मतदान करावयाचे आहे. त्यानुसार ‘अ’ मधील उमेदवारासमोरचे बटण दाबल्यानंतर त्यासमोरील लाल दिवा पेटेल, मग ‘ब’ मधील उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर त्यासमोरील लाल दिवा पेटेल व अशाचप्रकारे ‘क’ आणि ‘ड’ जागेमधील उमेदवारासमोरील बटन दाबल्यानंतर त्यासमोरील लाल दिवा पेटेल.

  जेव्हा चारही जागांसाठी प्रत्येक जागेसाठी एक अशाप्रकारे मतदान केल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन शेवटी ‘बीप’ असा आवाज येईल. बीप आवाज आला म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. बीप आवाज आल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे.

     यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक मतदाराला अ, ब, क, ड अशा प्रत्येक जागेसाठी एक असे स्वतंत्र मत द्यायचे आहे. ‘अ’ किंवा कोणत्याही एकाच जागेसाठी चारही मते देता येणार नाहीत. ‘एक जागा, एक मत’ याच सूत्राने अ, ब, क, ड अशा जागांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र मत द्यायचे आहे. जेव्हा कोणताही उमेदवार पसंत नसेल, तर प्रत्येक जागेमध्ये उमेदवारांची यादी संपल्यानंतर शेवटी ‘नोटा’ (NOTA- None of the above) हा पर्याय उपलब्ध असेल.

      तरी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय पध्दतीने होणा-या नमुंमपा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावावा आणि 1 ते 27 क्रमांकाच्या प्रभागातील नागरिकांनी अ, ब, क, ड या प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी 1 या प्रमाणे एकूण 4 मते तसेच प्रभाग क्रमांक 28 मधील नागरिकांनी अ, ब, क या 3 जागांमधील प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण 3 मते द्यावीत असे आवाहन करण्यात येत आहे.

  नवी मुंबईकर नागरिक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पध्दतीने होणा-या महानगरपालिका निवडणूकीमध्ये मतदान करणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅनर्स, पथनाट्ये, रिल्स, चित्रफिती, सोशल मिडीया अशा विविध माध्यमांतून बहुसदस्यीय पध्दतीत मतदान कसे करावे याविषयी जनजागृती करण्यात येत असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ मोहीमेंतर्गत विविध उपक्रमांतून लोकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहचविला जात आहे.

उमेदवारीची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दोन दिवसात कार्यालयात गर्दी लक्षात घेऊन चोख व्यवस्था

       दि. 30 डिसेंबर 2025 रोजी, दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन पोलीस विभागाच्या सहकार्याने सर्वच कार्यालयांमध्ये चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. आजही आठ कार्यालयांमधून 259 नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले ( 23 डिसेंबरपासून एकूण 2749 नामनिर्देशनपत्रांचे वितरण ) व मोठया प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर निवडणूक जाहिरातीसाठी पूर्वप्रमाणन आवश्यक       निवडणूकीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रसारमाध्यमे निरीक्षण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्याव्दारे मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे याचे दैनंदिन निरीक्षण केले जात आहे. याकरिता स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येऊन निरीक्षणासाठी कर्मचारी समुह नियुक्त करण्यात आलेला आहे.       मा.राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 09 ऑक्टोबर रोजीच्या प्रसार माध्यम सनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश 2025 नुसार महानगरपालिका निवडणूकीत विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे जाहिरात देण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरातीची प्रसिध्दी अथवा प्रसारण करण्यापूर्वी तिची नमुंमपास्तरीय समितीकडून पूर्व मान्यता घेणे आवश्यक आहे.      याकरिता जी जाहिरात प्रसारीत करावयाची आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील प्रती दोन पेन ड्राईव्हमध्ये आणि साक्षांकित मुद्रित दोन प्रतीसह परिशिष्ट 4 मधील अर्जासह नमुंमपा मुख्यालयात तिस-या मजल्यावर माहिती व जनसंपर्क विभागात प्रसारण करण्यापूवी 5 दिवस आधी समितीकडे सादर करावयाचे आहे व मान्यतापत्र प्राप्त करुन घेऊन जाहिरातीचे प्रसारण करावयाचे आहे. पूर्वप्रमाणन केले नसल्यास अशा जाहिरातींचे प्रसारण करता येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे

संबंधित पोस्ट

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार -शालेय शिक्षण विभाग

ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितींना दिली भेटब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी मार्फत ग्रामस्थांच्या अडचणीं सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार…

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे,सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन