vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार -कामगार मंत्री आकाश फुंडकर

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार -कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, द प्रतिनिधी : सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला क्षेत्रातील अभ्यासू व संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात येतील. प्राप्त सूचनांचा सकारात्मक विचार करून अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली

कामगार मंत्री श्री. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कामगार संहिता (Labour Code) च्या अनुषंगाने सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.या बैठकीस कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुन्मोड, उपसचिव रोशनी पाटील, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पुनम ढिल्लो यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतेसिने क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, वेतन, विमा, कामाचे तास, कल्याणकारी योजना तसेच कामगार संहितेतील तरतुदींची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिने कलाकारांच्या हितासाठी स्वतंत्र नियमावली तयार करून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, नवीन कामगार संहितेच्या चौकटीत सिने क्षेत्रातील कलाकार व संबंधित कामगारांच्या हितासाठी स्पष्ट व प्रभावी नियमावली तयार करण्यात येईल. त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेतयावेळी Cintaa (सिंटा) सिने एंड टेलीविज़न आर्टिस्ट एसोसिएशन वतीने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पुनम ढिल्लो यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक व विविध विभागांतील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या.

बैठकीदरम्यान नियमावली संदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

 ०००००० —

संबंधित पोस्ट

लोकसेवा हक्क कायदा, आपली सेवा आमचे कर्तव्य*नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत वर्षभरात तब्बल ५० लाख ६८ हजार अर्ज वेळेत निकाली**आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची माहिती*

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले जीवनदान..!- हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहणार

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंगनिदान चाचणीची खबर देणाऱ्यास पारितोषिक नागरिकांनी माहिती द्यावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या“डिजिटल व्हॅन” उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन संपन्न

संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी,सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल- न्यायमूर्ती भारती डांगरे ,इस्लामपूरमध्ये विधी साक्षरता, शासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta