vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांसाठी विशेष तपासणी मोहीमेला प्रारंभ;प्रलंबित अर्जदारांना हजर राहण्याचे आवाहन

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांसाठी विशेष तपासणी मोहीमेला प्रारंभ;प्रलंबित अर्जदारांना हजर राहण्याचे आवाहन

 

आरोग्य प्रतिनिधी-  अमरावती , : जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे प्रलंबित दिव्यांग अर्जांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन युडीआयडी पोर्टलवर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले आहेत, परंतु अद्याप वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, अशा सर्व अर्जदारांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.    अर्जदारांनी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत आपले मूळ अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित राहावे. ही मोहीम पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली.

     केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कॅन्सर, हृदयरोग, टी.बी., एचआयव्ही ग्रस्त, चर्मरोग व इतर दुर्धर आजार हे दिव्यांगत्वाच्या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा आजारग्रस्तांनी ऑनलाईन अर्ज करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अनेकदा माहितीअभावी असे रुग्ण अर्ज करतात आणि त्यांना आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन आपली तपासणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे“कर्करोग तपासणी वाहन लोकार्पण सोहळा”

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी· ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

आरोग्य अधिकाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण; ठाणे जिल्ह्यात हृदयविकारग्रस्तांना जीवनदान देण्याचा संकल्प…

जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…