vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामा लोकार्पण.

कोल्हापूर, 1 प्रतिनिधी : कागल शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या कै. व्हि. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र (पाझर तलाव) परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कृत्रिम कासव आकाराचा धबधबा’ आणि ‘रेनडान्स’चे लोकार्पण करण्यात आले, तसेच पर्यटकांच्या निवासासाठी प्रस्तावित असलेल्या भव्य ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’चे भूमिपूजनही करण्यात आले. कागल नगरपरिषदेच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा नगरपालिकेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

१५ कोटींच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. झालेल्या कामांबाबत यावेळी चित्रफीत दाखवण्यात आली. आजच्या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, कागल नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, माजी आमदार संजयबाबा घाटगे, अखिलेशराजे घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह कागल नगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कागल नगरपरिषदेने ‘नाविन्यपूर्ण योजना २०२४-२५’ अंतर्गत कामांच्या टप्पा दोन मध्ये सुमारे १ कोटी ६९ लाख रुपये खर्चून म्युजिकल सिस्टिमसह हा कासव आकाराचा धबधबा विकसित केला आहे. तसेच, ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान २०२५-२६’ अंतर्गत सुमारे ४ कोटी रुपये खर्चून ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’ उभारले जाणार आहे. दररोज सरासरी एक हजार पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता, येथे पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून पाण्याचे रिसायकलिंग, सोलर पार्क आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. या सर्व सोयीसुविधांमुळे कागलचा पाझर तलाव परिसर आता जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळातर्फेकर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन,· ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५

वारणा धरणात 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा

vishwatmaklokswamivarta

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर..भाजपा सरचिटणीस विनोद तावडे, राज्य मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले तर पक्षाचे नेते माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर.

vishwatmaklokswamivarta