vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यातंत्रज्ञानप्रदेश

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारताच्या डिजिटल कौशल्य परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ‘विकसित भारत’च्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी, भारत सरकारचे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेच्या निमित्ताने “बढना है तो यहाँ जुडना है” (प्रगतीसाठी सहभाग) या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला.

या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यांची चिरंतन लोकप्रियता आणि जनमानसातील दांडगा प्रभाव यामुळे कौशल्य, रोजगार आणि आजीवन शिक्षणासाठी असलेल्या भारताच्या एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ‘कौशल्य भारत डिजिटल हब’ (स्कील इंडिया डिजिटल हब-एस आय डी एच) बद्दलची जागृती आणि त्यातील लोकांचा सहभाग अधिक वाढेल, अशी अपेक्षा आहे.

या मोहिमेचे उद्दिष्ट ‘एस आय डी एच’ ची पोहोच अधिक विस्तारणे हे आहे. या व्यासपीठावर आधीच 1.5 कोटींहून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली असून, हे देशातील सर्वात मोठ्या एकीकृत डिजिटल कौशल्य व्यासपीठांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. भारत ज्या वेगाने ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन (यंत्र स्वयंचलन)आणि डिजिटल नवोन्मेषांच्या बदलांना सामोरे जात आहे, त्या काळात नागरिकांना त्यांचे कौशल्य अद्ययावत करण्यासाठी, नवीन कौशल्ये आत्मसात करत राहण्यासाठी, आणि भविष्याच्या दृष्टीने त्यांची व्यावसायिक कारकीर्द सुरक्षित करण्यासाठी ‘एस आय डी एच’ हे एक मुख्य इंजिन म्हणून काम करत आहे.

शुभारंभ प्रसंगी बोलताना जयंत चौधरी म्हणाले, “भारताच्या डिजिटल सामर्थ्याला, ‘इंडिया स्टॅक’ आणि आता ‘कौशल्य भारत डिजिटल हब’ सारख्या क्रांतिकारक उपक्रमांमुळे, जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. या व्यासपीठांनी सार्वजनिक सेवा आणि कौशल्य विकासाची दारे अभूतपूर्व प्रमाणात सर्वांसाठी खुली केली आहेत.”

एआय आणि ऑटोमेशनच्या युगात, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा कशा प्रकारे जीवनभराच्या शिक्षणाला आणि प्रत्यक्ष आर्थिक संधी निर्माण करण्याला बळ देऊ शकतात याचे उदाहरण म्हणून एसआयडीएच-सिध कडे पाहाता येईल. ‘बढना हैं तो यहां जुडना हैं’ मोहिमेद्वारे आम्ही प्रत्येक भारतीयाला या परिसंस्थेशी जोडू इच्छितो आणि विकासाच्या प्रवासात पुढचे पाऊल उचलण्यासाठी आमंत्रित करत आहोत.

पहिल्यांदा मोबाईल साठी, एआय सक्षम व्यासपीठ असलेल्या सिध अनेक सरकारी कौशल्य उपक्रमांना एकत्रित करते आणि उद्योगांशी निगडित आणि भविष्यवेधी तयार अभ्यासक्रम पुरवते आणि विद्यार्थ्यांची रुची आणि करिअर उद्दिष्टांवर आधारित वैयक्तिक शिफारसीदेखील प्रदान करते. या व्यासपीठामध्ये एलएमएस सक्षम केंद्रीय शिक्षण केंद्र, डिजिटल पद्धतीने सत्यापित, क्यूआर कोड सक्षम वैयक्तिक डिजिटल स्वरुपातील सीव्ही, आधार आधारित ई केवायसी नोंदणी, ओटीपी आधारित मोबाईल प्रवेश आणि २१ भारतीय भाषांमध्ये उपलब्धता आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात समावेशन आणि प्रवेश सुलभता सुनिश्चित होते.

सिधच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वापरकर्त्यांना सेवा प्राप्त होते- करिअरच्या वाटा शोधणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते कार्यबल म्हणून प्रवेश करू इच्छिणाऱ्या पदवीधारकांपर्यंत, आपल्या कौशल्यांना अद्ययावत करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते भविष्यातील उगवत्या उद्योजकांपर्यंत सर्वांना ही सेवा मिळते. वेगवेगळी कौशल्ये आणि रोजगाराचे स्रोत यांना एकाच मंचावर आणत सिध ने प्रवेश, माहिती, भाषा आणि विश्वासार्हता यांचे अडथळे दूर केले आहेत आणि संधींचे लोकशाहीकरण केले आहे.

बढना है तो यहां जुडना हैं’ मोहीम डिजिटल व्यासपीठ, समाज माध्यमांवरील वाहिन्या, अॅप परिसंस्था आणि क्यूआर सक्षम संवाद यांवर सुरू होईएल जेणेकरून अडथळ्याविना आणि त्वरित नोंदणी शक्य होणार आहे. या मोहिमेचे चित्र भारताच्या विविधतेतवर प्रकाश टाकते- तरुण, महिला, व्यावसायिक, उद्योजक आणि दिव्यांग नागरिक असो विकास आणि संधी प्रत्येकासाठी असल्याचा संदेश अधोरेखित करते.

समृद्धीसाठी आजीवन शिक्षणाच्या दृष्टीकोनात कोणासाठी, कधीही, कुठेही भविष्यासाठी कार्यबल सज्ज करण्यासाठी आणि जागतिक कौशल्य भांडवल म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते.

संबंधित पोस्ट

मराठवाडा पाणी प्रश्नाबाबत जलसंवादचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

जेजुरी गडकोटातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेला आणि भंडाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत येणार आहे. अन्न व औषध प्रशासन लवकरच जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित करणार –

vishwatmaklokswamivarta