vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

राज्य प्रतिनिधी-गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (‘इफ्फी’च्या) समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली आणि चित्रपटात दाखवलेले पवित्र दैवत कोटीतुलू समाजातील ‘श्री चामुंडी दैवा’ हिला ‘फिमेल घोस्ट’ (महिला भूत), असे संबोधले आहे. या प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह यांच्यावर चामुंडी दैवाचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने पणजी पोलीस ठाण्यात दिले आहे.

या वेळी पणजी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साहिन शेट्ये यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रमोद तुयेकर आणि श्री. दिलीप शेट्ये यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘श्री चामुंडी दैवा’ हे कर्नाटकातील तुलू समाजाचे आराध्य आणि कुलदैवत आहे. देवीला ‘भूत’ म्हणणे आणि तिच्या दैवी अवताराची करमणुकीच्या हेतूने सर्वांसमोर नक्कल करणे, ही अत्यंत अवमानकारक आणि हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानावर आघात करणारी कृती आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी रणवीर सिंह यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९९, १९४, ३०२ नुसार धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावणे आणि समाजात वैरभाव पसरवणे या गुन्ह्यांशी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी.

‘इफ्फी’चे आयोजक आणि संबंधित अधिकारी यांनीही भविष्यात अशा कार्यक्रमांत कोणत्याही धर्माच्या देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी स्पष्ट आचारसंहिता सिद्ध करावी आणि त्याची काटेकोर कार्यवाही करावी. हिंदु जनजागृती समितीने ‘रणवीर सिंह यांनी सार्वजनिकरित्या श्री चामुंडी दैवाची क्षमा मागावी आणि पुढे अशा प्रकारचे वक्तव्य अथवा अभिनय न करण्याची हमी द्यावी’, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व हिंदु बांधवांना कायद्याचा मार्ग अवलंबून शांततामय, संयमी; पण ठामपणे या अवमानाचा निषेध नोंदवण्याचे आवाहनही समितीने केले आहे.श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : ९९८७९ ६६६६६)

 

————–

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतशेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

नशा नाही, नवचैतन्याची दिशा घेऊया!” — जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या DAWN उपक्रमांतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदान वाढ झाल्याने संशोधन वृत्तीला बळ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली. 

पीक-विशिष्ट उत्पादन कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आढावा कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ द्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta