vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

    अमरावती, प्रतिनिधी) : माहे सप्टेंबर 2025मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ जमा करण्यात येत आहे. ही मदत बँक खात्यात जमा होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

    कृषि, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार, सर्व शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली आहे, अशांच्या बँक खात्यात सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ जमा केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली आहे, त्यांना ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

   शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नसल्यास तात्काळ नोंदणी पूर्ण करावी. यासाठी शेतकऱ्यांनी आपला गाव नमुना नं., सातबारा उतारा आणि आधारकार्डसह आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. केंद्रावर आपली अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आणि फार्मर आयडी प्राप्त करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी..

vishwatmaklokswamivarta

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन– केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

vishwatmaklokswamivarta

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

वसतिगृह प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय; ३० वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांनाही ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर मिळणार सहकार्य आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा; शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

लातूर येथे आज 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta