vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

 महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

राज्य प्रतिनिधी-

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प : शासन व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून निरोगी महाराष्ट्राकडे वाटचाल!

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, फाळणीच्या कठीण काळानंतर सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आणि आता देश-विदेशातून रुग्ण येथे उपचारासाठी येऊन आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत.

ड्रग-रेझिस्टंट क्षयरोगावरील (DR-TB) उपचारांसाठी या रुग्णालयाने केलेल्या नवीन उपक्रमांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्षयरोगावरील उपचारांसाठी या संस्थेने विकसित केलेले धोरण पुढे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारण्यात आले. एखाद्या संस्थेचा नवोपक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्य होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गरीब व वंचित घटकांना विविध स्वरूपात मदत, मोफत उपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देत सामाजिक दायित्व पार पाडण्यात हे रुग्णालय अग्रणी आहे. तसेच, हिंदुजा हॉस्पिटलसारख्या संस्थांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना शासकीय योजनांशी जोडून ते अधिक व्यापक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस आहे.

00000

संबंधित पोस्ट

किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी*  *सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.स्मारकासाठी निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना.* 

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी NIELIT संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक दोन्ही सभागृहात संमत…

सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देवू,महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध  — वनमंत्री गणेश नाईक