vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचे दानवाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी‘बुक बॅंक’ उपक्रम- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचे दानवाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी‘बुक बॅंक’ उपक्रम- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बॅंक हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याद्वारे वाचन चळवळीलाही बळकटी मिळेल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बुक बॅंक’ उपक्रमांतर्गत १००० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून बुक बॅंक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल अधिकारी- कर्मचारी यांनी स्वतःच्या देणगीतून १००० पुस्तके खरेदी करुन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व आश्विनी लाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, नीलम बाफना, लतिफ पठाण तसेच अन्य महसूल अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक जयश्री चव्हाण यांनी केले. आभार संगिता गायकवाड यांनी मानले.

०००००

संबंधित पोस्ट

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा ६ मार्च रोजी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक लाफ्टर डे निमित्त धारावीतील लोकांसोबत हास्य डे उत्साहात संपन्न

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta