vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

विभागीय हातमाग कापड स्पर्धाचे आयोजन* 

*विभागीय हातमाग कापड स्पर्धाचे आयोजन*

 

गडचिरोली, ( प्रतिनिधी : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेमार्फत हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यानुसार विभागीय हातमाग कापड स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन विभागीय आयुक्त, नागपूर, श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचे अध्यक्षतेखाली दि. २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, ८ वा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१, नागपुर येथे करण्यात आले आहे. तरी अमरावती आणि नागपुर विभागातील सर्व जिल्हयाचे हातमाग विणकरांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याकरीता हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात दिनांक २० मार्च २०२६ रोजी ५.०० वाजेपर्यत सादर करण्यात यावे. पत्ता पुढीलप्रमाणे आहे- प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपुर प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, “बि” विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर, अधिक माहीतीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयास ०७१२-२५३७९२७ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन अंजू बालपांडे प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर तथा सदस्य सचिव, विभागीय हातमाग कापड स्पर्धा यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 2 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने मंदार शिंदेची मेणबत्ती, कापूर व्यवसायवृद्धी …

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन