vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या- थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या- थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड

जालना, प्रतिनिधी- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांमधून जालना जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांची अंतिम निवड आता लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी तथा लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष शशिकांत हदगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. हा कार्यक्रम दि. 30 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संपन्न होणार आहे.

महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाला मुख्यालयाकडून एकूण 40 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी स्थानिक प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी दिल्यानंतर जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या एकूण 162 अर्जांची छाननी केल्यानंतर, त्यापैकी 144 अर्ज पात्र ठरले असून 18 अर्ज तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या या 144 उमेदवारांमधून केवळ 40 लाभार्थ्यांची निवड पारदर्शकपणे लॉटरी पद्धतीने केली जाईल. निवडीमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी ही जाहीर सोडत काढण्यात येणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे अर्जदारांच्या उपस्थितीत ही पारदर्शक निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तरी निवड प्रक्रियेवेळी पात्र अर्जदारांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय-महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरसाठी 254 जादा बसेस…

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती

डेअरी आणि चीज ॲनालॉगच्या वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन