vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशी संवाद गॅस वितरणाचा दैनंदिन आढावा, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशी संवाद गॅस वितरणाचा दैनंदिन आढावा, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

अकोला, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी गॅस एजन्सीला भेट देऊन गॅस सिलेंडर वितरणाचा आढावा घेतला. नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पेट्रोलियम कंपन्यांशी दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

जिल्‌हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. एचपी अकोला गॅस एजन्सी तसेच मालीवाल भारत गॅस एजन्सी येथे भेट देऊन वितरणाबाबत आढावा घेण्यात आला. घरगुती गॅसचा तुटवडा नसून ग्राहकांची केवायसी सुध्दा होत आहे.

गॅस एजन्सीमध्ये गॅस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांसोबत जिल्हाधिका-यांनी संवाद साधला. नागरिकांच्या गॅस सिलेंडर वितरणाबाबत विचारणा करण्यात आली. गॅस सिलेंडर वेळेत मिळत असल्याबाबत नागरिकांनी सांगितले.

भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन, प्रशासन आपल्या सोबत आहे, नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पेट्रोलियम कंपन्यांशी दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे याबाबत आवाहन यावेळी करण्यात आले.

०००

संबंधित पोस्ट

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ११७ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात* *- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर*