vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

मित्र सहयोग, ठाणे यांची ‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका

मित्र सहयोग, ठाणे यांची ‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका

सांस्कृतिक प्रतिनिधी-ठाणे – गडकरी रंगायतन, ठाणे येथे २ एप्रिल २०२६ रोजी उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी पार पडली. पन्नाशी पार केलेल्या तरुणांच्या सळसळत्या उत्साहात दमदार पाच एकांकिका सादर झाल्या. त्यापैकी मित्र सहयोग, ठाणे यांच्या ‘अनोळखी’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका हा प्रथम पुरस्कार पटकावला. रंगा थिएटर्स, ठाणे यांच्या ‘तरुणाई’ ने द्वितीय, तर ठाणे आर्ट गिल्ड यांच्या ‘ती येते आणि जाते’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या सहकार्याने आणि मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या आयोजनाने ही स्पर्धा अतिशय उत्तमरीत्या पार पडली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी लेखक-दिग्दर्शक विनोद जाधव, अभिनेता संदीप रेडकर आणि अभिनेत्री योगिनी चौक हे परीक्षक म्हणून लाभले होते. तसेच लेखक-दिग्दर्शक विशाल कदम, दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर, अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकर,ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी समेळ, अभिनेत्री संपदा जोगळेकर, नाट्य परिषद, ठाणे शाखेचे पदाधिकारी नरेंद्र बेडेकर, विद्याधर ठाणेकर, सॉफ्ट कॉर्नरचे एमडी व सीईओ दिलीप कुलकर्णी आणि मिसेस कुलकर्णी यांच्यासह ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पन्नाशी पार केलेल्या स्पर्धकांचा उत्साह आणि उत्तम विषयांची निवड करून केलेली सादरीकरणे पाहून उपस्थित मान्यवर, परीक्षक आणि पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. अंतिम फेरी पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती.

ठाणे, पालघर, नवी मुंबई, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, चिपळूण आणि मुंबई अशा विविध ठिकाणांहून स्पर्धक संघांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आयोजक मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. सोबतच, दरवर्षी स्पर्धेला असाच उत्तम प्रतिसाद मिळत राहावा आणि प्रेक्षकांची उपस्थिती वाढत राहावी, अशी आशा व्यक्त केली.

वैयक्तिक पारितोषिके :

-लेखन प्रथम – श्रीरंग खटावकर ( तरुणाई )द्वितीय – स्मिता दातार ( ती येते आणिक जाते)

दिग्दर्शक-

प्रथम – हर्षदा बोरकर ( अनोळखी )

द्वितीय- सुषमा भागवत ( ती येते आणिक जाते )

अभिनेता

प्रथम – योगेश केळकर ( तरुणाई )

द्वितीय – योगेश खांडेकर ( अनोळखी )

अभिनेत्री  –

प्रथम – अस्मिता भल्ला ( अनोळखी )

द्वितीय – शब्दुली सुतार ( ती येते आणिक जाते)

तृतीय – तृप्ती तासगावकर ( साठी )

संगीत

प्रथम – मंदार पाटील ( ती येते आणिक जाते )

प्रकाश

प्रथम – श्याम चव्हाण ( अनोळखी )द्वितीय- यश सुर्वे ( साठी )

नेपथ्य-प्रथम – विश्वनाथ चांदोरकर ( अनोळखी )द्वितीय – चारुदत्त वैद्य ( ती येते आणिक जाते

00000

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला…

vishwatmaklokswamivarta

आज शुक्रवार 5 सप्टेंबर 2025या शुभ दिनी “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग…

vishwatmaklokswamivarta

अखेर अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी निर्माता आणि राकेश सारंग दिग्दर्शक यांना न्याय मिळाला. 

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कार्तिक आर्यन आणि मामुट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आर्टिकल ३७० सर्वोत्कृष्ट चित्रपट

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर, आई संथकुमारी यांचे 90 व्या वर्षी निधन..

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या पाकिस्तान समर्पित आतंकवादी यांचा हल्ल्याच्या निषेधार्थ 27 लोक मृत्युमुखी पडले अनेक जखमी झाले त्यावर अभिनेता सलमान खान शाहरुख खान प्रियंका चोप्रा यांनी दिल्या प्रतिक्रिया…..