vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

जम्मू कश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या पाकिस्तान समर्पित आतंकवादी यांचा हल्ल्याच्या निषेधार्थ 27 लोक मृत्युमुखी पडले अनेक जखमी झाले त्यावर अभिनेता सलमान खान शाहरुख खान प्रियंका चोप्रा यांनी दिल्या प्रतिक्रिया…..

जम्मू कश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या पाकिस्तान समर्पित आतंकवादी यांचा हल्ल्याच्या निषेधार्थ 27 लोक मृत्युमुखी पडले अनेक जखमी झाले त्यावर अभिनेता सलमान खान शाहरुख खान प्रियंका चोप्रा यांनी दिल्या प्रतिक्रिया…

राज्य प्रतिनिधी- जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खाननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. शाहरुख खानने जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांशी पाठीशी राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसंच देशवासीयांना ही वेळ एकत्र राहण्याची आहे असं म्हटलं आहे.

अभिनेता शाहरुखने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचाराबद्दलचे दुःख आणि राग शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशावेळी, फक्त देवाचा धावा करु शकतो आणि पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करू शकतो. एक राष्ट्र म्हणून आपण एकजूट, मजबूत राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू”.

[ अभिनेता सलमान खाननेही एक्सवर पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. त्याने लिहिलं आहे की, “पृथ्वीवरील स्वर्ग असणारा काश्मीर नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मनात वेदना आहेत. एका निष्पाप व्यक्तीची हत्या करणे हे संपूर्ण देशाला मारण्यासारखे आहे”. अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिच्या इंस्टाग्रामवर संताप व्यक्त करणारा मेसेज लिहिला आणि या दहशतवादी कृत्याचा निषेध केला. तिने लिहिलं आहे की, “पहलगाममध्ये जे घडले ते निंदनीय आहे. लोक तिथे सुट्टीसाठी, हनिमूनसाठी, त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंद साजरा करण्यासाठी होते. फक्त काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेत होते. ही अशी दुर्घटना नाही जी आपण सहजासहजी विसरु शकतो. अनेक निष्पाप जीव अशा वादळात अडकले ज्याची त्यांनी कधीही अपेक्षा केली नव्हती. त्यांच्या प्रियजनांसमोरच त्यांना लक्ष्य करण्यात आले. मला खूप वाईट वाटत आहे”.

संबंधित पोस्ट

मराठी भाषा सक्ती : नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित

गुणवंत विद्यार्थी घडविणा-या नवी मुंबई महानगरपालिका शिक्षकांचा गौरव…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

गोव्यात झालेल्या दूरसंचार विभागाच्या वार्षिक पश्चिम विभागीय परिषदेत उदयोन्मुख सुरक्षा विषयक समस्या आणि उपाययोजनांवर करण्यात आली चर्चा..

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; – अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी..

vishwatmaklokswamivarta