vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : आपल्या परिसरात कुठेही अनधिकृत, बालगृहे, वसतिगृहे चालवली जात असल्याचे आढळताच टोल फ्री क्रमांक १०९८ वर तत्काळ माहिती द्यावी व बालकांच्या शोषणास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे विनापरवानगी बालगृहे, वसतिगृहे आणि अनाथाश्रम चालवले जात असल्याचे वृत्त माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले. या ठिकाणी बालकांना जबरदस्तीने ठेवून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. ही बाब अतिशय गंभीर असून बाल न्याय अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र बाल न्याय नियम २०१८ यांचे सरळ उल्लंघन आहे. या अधिनियमाच्या कलम ४२ नुसार, अशा प्रकारच्या संस्थांना आवश्यक ती मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्राविना संस्था चालवणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास व किमान १ लाख रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतो.
नागरिकांनी आपल्या परिसरात अशा कोणत्याही अनधिकृत संस्थांची माहिती मिळाल्यास त्वरित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा चाईल्ड हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांक १०९८ वर माहिती द्यावी, जेणेकरून बालकांवरील शोषण रोखता येईल. बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.
0000000

संबंधित पोस्ट

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे..

बिहारच्या लखीसरायमध्ये अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, तर १० हून अधिक भाविक गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जगाला भुरळ घालणारा एक भारतीय सोशल मीडिया अवलिया!!! तारिक खत्री.

📚✨ जालना मनपा शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न