vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञानप्रदेश

सार्वत्रिक निवडणुका व पोटनिवडणुका 2026: ईसीआयनेट प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या

सार्वत्रिक निवडणुका व पोटनिवडणुका 2026: ईसीआयनेट प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या…

नवी दिल्‍ली, प्रतिनिधी-

निवडणूक आयोगाने 15 मार्च 2026 रोजी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तसेच गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा येथील 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

9 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुका तसेच 4 राज्यांतील पोटनिवडणुकांसाठी एकूण 1,955 उमेदवार रिंगणात आहेत.पश्चिम बंगाल (पहिला व दुसरा टप्पा) आणि तामिळनाडू येथील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) साठी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल असून पश्चिम बंगाल (दुसरा टप्पा) साठी 13 एप्रिल आहे.

नागरिकांना ईसीआयनेटमधील “Know Your Candidates ” केवायसी मॉड्युलद्वारे उमेदवारांविषयीची माहिती, गुन्हेगारी प्रकरणे, मालमत्ता व दायित्वे, शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वर मिळू शकते.वापरकर्ते ईसीआयनेटमधील “Conduct of Elections” या टॅबखालील केवायसी मॉड्युल वापरू शकतात. तसेच उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्राची (फॉर्म 26) संपूर्ण प्रत डाउनलोड करता येते.

ईसीआयनेट हे जगातील सर्वात मोठे निवडणूक सेवा प्लॅटफॉर्म असून, भारताच्या निवडणूक आयोगाच्या 40 पेक्षा अधिक अ‍ॅप्स व पोर्टल्स एकत्रित करून सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देते.ईसीआयनेटद्वारे मतदारांना मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्ज स्थिती तपासणी, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, बीएलओशी संवादासाठी कॉल बुकिंग, ई-ईपिक डाउनलोड, मतदान प्रवृत्ती आणि तक्रार निवारण यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

याशिवाय, नियमभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी सी विजिल आणि दिव्यांग मतदारांसाठी सुलभ सेवा सुनिश्चित करण्यासाठी सक्षम यांसारखी साधनेही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

0000

संबंधित पोस्ट

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

vishwatmaklokswamivarta

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार..  

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta

भोजापूर प्रकल्पाचा नदीजोडमधील समावेशासाठी आराखडा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ११ वंचित गावांसाठी सर्वेक्षणाचे आदेश

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta