vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

 बुलढाणा प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव जामोद तालुक्यातील रिक्त असलेल्या सरपंच आणि सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये भिंगारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह तालुक्यातील कुंवरदेव, मडाखेड खुर्द, मांडवा, माहुली, गोळेगाव खुर्द, मडाखेड बु., निंभोरा बु. आणि जामोद या ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. त्यानंतर १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २८ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल आणि २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, तहसीलदार पवन पाटील यांनी सर्व नागरिकांनी या निवडणूक प्रक्रियेची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विधानसभा निवेदन :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत- सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

मानखुर्द परिसरात ५ एकर शासकीय जागा अतिक्रमणमुक्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून निष्कासनाची कारवाई

महिला व बालविकास विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली.

सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहिले जावे – सचिव, शालेय शिक्षण

vishwatmaklokswamivarta