vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका क्षेत्राातील लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज चौक, आर.जे. ठाकूर कॉलेज नाका तसेच कामगार नाका परिसरात होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

            सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, नगरसेविका कांचन चिंदरकर, शितल ढमाले, उपायुक्त उमेश बिरारी, दिनेश तायडे, कार्यकारी अभ‍ियंता संदीप सावंत आदी उपस्थित होते.

 

            या परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पी वन, पी टू अशा प्रकारे पार्किंगचे योग्य नियोजन करण्यात यावे, तसेच प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे जुनी वाहने, भंगारमध्ये नादुरूस्त अवस्थेत असलेली, गंज लागून जीर्ण झालेली वाहनांची संख्या मोठी आहे, अशी वाहने अतिक्रमण विभागामार्फत तात्काळ हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या बैठकीत दिल्या.

 

शास्त्रीनगर नाका, हत्तीपूल येथे बसेसकरिता पार्किंगचे दोन प्लॉट देण्यात यावे अशी सूचना सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी केली. इंदिरानगर ते रोड नं. 22, लोकमान्यनगर पाडा, आर.जे. ठाकूर व इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये परिवहन बसेसची संख्या वाढविली तर या परिसरातील वाढणाऱ्या रिक्षांवर आळा बसेल अशी सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी केली.

प्रभागातील रस्त्यांवरील सोसायट्यासमोर नागरिकांनी अवैध रित्या पार्क केलेल्या वाहनांवर नियमित कार्यवाही करावी. यशोधन नगर येथून डेपोकडून जाणारे रस्ते या ठिकाणी असलेल्या गॅरेजवाल्यांवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करावी, गोमास्ता लायनेन्स कार्यालय परिसरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी तातडीने हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी, या विभागात मंगळवारचा आठवडी बाजार बंद करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित विभागाला दिल्या. आहेत

संबंधित पोस्ट

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यत प्रभावीपणे पोहोचवा- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची-प्रभावी अंमलबजावणी करावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

vishwatmaklokswamivarta

चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीय पातळीवर नेणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास चिखलदरा ते दिल्लीपर्यंत मार्केट उपलब्ध करू