vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मा.आ.कैलास गोरंटयाल आज गुरु गणेश भवनमध्ये स्वीकारणार शुभेच्छा

मा.आ.कैलास गोरंटयाल आज गुरु गणेश भवनमध्ये स्वीकारणार शुभेच्छा

जालना (प्रतिनीधी) जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल हे त्यांच्या वाढदिवसा निमित्त आज गुरुवार दि.९ एप्रिल रोजी शहरातील गुरू गणेश भवनमध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उपस्थीत राहून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या पाताल हनुमान मंदीरात दर्शन आणि आरती करण्यात येणार असून त्यानंतर ९.३० वाजता रामतीर्थ स्मशान भूमीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता पांजरापोळ गौशाळेत गोमातांना चारा देणार आहेत.तेथेच गुळतुला व रक्तदान शिबिरास उपस्थिती, १०.३० वाजता कन्हैय्यानगर येथील श्री कृष्ण हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते होणार आहे.१०.३० वाजता कडबी मंडी येथे मिठाई वाटपाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर १०.४५ वाजता मोदीखाना भागातील दक्षिण हनुमान मंदिर येथे फळतुला कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी ११ वाजता गुरू गणेश अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व पादत्राणे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत श्री गोरंटयाल हे उपस्थीत राहून जालना विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दरम्यान, यावर्षी मा.आ.कैलास गोरंटयाल हे वाढदिवशी हार, पुष्पगुच्छ, शाल स्वीकारणार नाहीत. त्या ऐवजी गणवेश,वही,पेन आदी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून स्वीकारणार असून सदर साहित्य मनपा शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे युवा नेते नगरसेवक अक्षय गोरंटयाल यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

नेरुळ रुग्णालयातील कॅन्सर तपासणी कक्ष व आरोग्य सुविधांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी

दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !**अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?* – सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा**‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ? – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

मसिहा फाउंडेशन तर्फे भगवान बाबा बालिकाश्रम बालगृहात अन्नदान वाटप…..आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम राबवला. 

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल- पणनमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta