vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

क्रांतीचा साक्षीदार एकपात्री प्रयोगातून उलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास…

क्रांतीचा साक्षीदार एकपात्री प्रयोगातून उलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास…

 

जालना, प्रतिनिधी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने जालना शहरात एका विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे क्रांतीचा साक्षीदार या एकपात्री नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने दि. 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. महात्मा फुले यांचे हे 150 वे जयंती वर्ष (द्विशताब्दी वर्षाकडे वाटचाल) असून, त्यांच्या गौरवशाली जीवनप्रवासावर आधारित हे नाटक सादर केले जाणार आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल हा क्रांतीचा विचार या प्रयोगातून मांडला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जालना यांनी या ऐतिहासिक आणि वैचारिक कार्यक्रमासाठी जालना शहरातील नागरिक, विचारवंत आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव; संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा सन्मान

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ ची अंमलबजावणी कराव  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta