vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न 

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न

नांदेड प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने आज 10 एप्रिल रोजी केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत समाज कल्याण कार्यालयात मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांना समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देवून सन्मानीत करण्यात आले. या कार्यशाळाचे अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे होते तर वरीष्ठ समाज कल्याण निरिक्षक माधवी राठोड तसेच लक्ष्मी गायके हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्तावीक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांनी केले असून त्यांनी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सहभागी 40 ते 50 लाभार्थ्यांना मनी मर्जीनचे महत्व सांगून मार्गदशन केले. यावेळी त्यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांनी उपस्थित नवउद्योजक यांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्थी यांना 15 टक्के मार्जीन मनी उपलब्ध करुन देण्यात येते. याबाबत सविस्तर माहिती देवून तळागाळातील उपस्थित नवउद्योजक यांना सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले.

केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळेअंतर्गत अध्यक्षीय समारोपात समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी नवउद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत अनुसूचित व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्व- हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँडॲप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत 15 टक्के मार्जीन मनी राज्य शासनार्फत देण्यात येते अशी महत्वपूर्ण माहिती देवून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आभार समाज कल्याण निरिक्षक राणी गडगीळे यांनी तर सुत्र संचालन तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्ररिश्रम घेतले. या एक दिवशीय केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळा सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कुटुंबव्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘स्वप्न तुझे माझे’उपक्रम प्रभावीपणे राबवा- श्रीमती विजया रहाटकर