vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

सातारा प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सातारा शहरात भव्य ‘समता दिंडी’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या दिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या समता दिंडीची सुरुवात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथून करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव, जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, समाज कल्याण अधिकारी श्रुती रकटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतापसिंह हायस्कूल येथून निघालेली ही दिंडी राजपथावरून मार्गस्थ झाली. दिंडीचा समारोप सातारा नगर पालिका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापाशी झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समतेचा संदेश देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण सातारा शहर आंबेडकरमय झाले.

00000

संबंधित पोस्ट

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी, विना परवानगी आंदोलन किंवा हिंसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा.